Click here to go back
आधार :
Image of a calender
Dec 11 , 2021
Logo of a Customer
हिमांशू शहा
Image of a man working on his laptop

स्वतः एकदा होऊन बघा एखाद्याच्या पंखांना बळ देणारं सामर्थ्य

“Life is a race, अगर तेज नाही भागोगे तो कोई तुम्हें कुचल के आगे चला जाएगा”, ३ Idiots चा हा डायलॉग आज किती खरा वाटतो ना! आयआयटीच्या १३००० सीट्ससाठी लढणारे १० लाख विद्यार्थी, नीटसाठी १५ लाख, यूपीएससीसाठी तर ५ लाखातून ७५९ सीट्स. हे तर मोठ्या वर्गांसाठी, लहान मुलांचे पालक सुद्धा आपल्या मुलांची इतरांशी तुलना करतात. ९०% च्या खाली मार्क्स म्हणजे सर्व संपले असे समजतात. मुलांना आपल्या कधी न संपणाऱ्या आणि नको त्या अपेक्षांचे ओझे देतात. मी असे नाही म्हणत की स्पर्धा परीक्षा नको पण त्या बाबतीत इतकी जास्त hype नको. या आभासी आणि भाबड्या स्पर्धेच्या दबावामुळे मुले नकळत काही नवीन करण्याचे, आपली आवड शोधण्याचे स्वातंत्र्यच गमावतात. स्वप्नांच्या त्या कळ्या उमलण्याआधीच तोडल्या जातात. यातूनच मग डिप्रेशन येते किंवा काही वेळा तर टोकाचे पाऊलही विद्यार्थी उचलतात. काय होत असेल त्या लहान जीवाचे ज्याला आपले अस्तित्व दाखवण्यासाठी, जगासारखे ‘Normal’ असण्यासाठी आपल्या स्वप्नांचा बळी द्यावा लागतो?

दरवर्षी आपण दुष्काळाच्या बातम्या बघतो परंतु माझा शेतकरी, तो दुष्काळ जगतो. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ. आपण बघतो की हिमालयीन नद्यांना पूर येऊन उत्तरेकडील राज्यात पिकांचे नुकसान होते तर आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात पावसाने मारलेल्या दडीमुळे दुबार- तिवार पेरणीचे संकट निर्माण होते व या सगळ्यात आपला शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत होतो.

इंजिनीयर, डॉक्टर सरकारी अधिकारी याशिवाय चांगले भविष्य कुठे दिसतही नाही. फक्त शिक्षण क्षेत्र नव्हे, पण प्रत्येक क्षेत्रात अशीच परिस्थिती आहे. आता करायचे तरी काय ? अश्या प्रचंड मानसिक दबावातून आपण सर्वच कधी ना कधी गेलो आहोत. अश्या वेळी आपल्याला सगळ्यात जास्त गरज असते ती म्हणजे एका रॅन्चोची. हा रॅन्चो म्हणजे कोणी ही असू शकतो बरं का!

आधार देणे म्हणजे नेमके काय ? यात कोणते श्रम नाही किंवा खूप खडतर असे काही नाही. टेंशनमध्ये असताना दिलेली एक मिठी एखाद्याचा दिवस बनवू शकते. आपुलकीने बोललेले दोन शब्द त्याला पुन्हा एकदा लढण्याची हिम्मत देतात. तू चांगले करतोय, लाऊन धर ही एखाद्यासाठी नव्या जीवनाची उमेद बनते. आपण दररोज केलेली विचारपूस संपूर्ण दिवसाचा थकवा घालवू शकते. किती वेळ जाईल यात ? जास्तीत जास्त १५ मिनिटे, पण या १५ मिनिटांचा प्रभाव पुढचा संपूर्ण दिवस समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसेल.
काही वेळा आपला दृष्टिकोन ही आपल्यासाठी आधार बनू शकतो. गगनचुंबी इमारतीचे स्वप्न बघणारा मी जेव्हा डोक्यावर छप्पर नसलेला भिकारी पाहतो, तेव्हा नैराश्य सोडून स्वतःला नशीबवान म्हणावेसे वाटते.

तर आपल्या आजूबाजूला झाकून एकदा बघा. स्वता:त हरवलेल्या, घाबरलेल्या एखाद्या पाखराच्या पंखांचे बळ तुम्ही बनू शकता. एखाद्या राजू आणि फरहानच्या आयुष्यातले रॅन्चो तुम्ही बनू शकता.